जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते उद्घाटन
कोल्हापूर, दि. २० : शिवाजी विद्यापीठाचा भौतिकशास्त्र विभाग, नीम करौली बाबा चॅरिटेबल ट्रस्ट (कोल्हापूर) आणि छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, २४ मार्च रोजी भव्य ‘आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा उद्घाटन समारंभ सकाळी ठीक १०.१५ वाजता विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र सभागृहात संपन्न होईल. या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी, कुलसचिव डॉ. व्ही एन शिंदे, व्यवस्थापन परिषदेचे स्वागत परुळेकर, भौतिकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. आर.जी. सोनकवडे, नीम करौली बाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या सौ. शीतल सोनकवडे, अधिष्ठाता सीपीआर रुग्णालय डॉ. सदानंद भिसे, डॉ. भूषण मिरजे यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
शिबिरातील मोफत आरोग्य सुविधा
या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून खालील विषयांवर मोफत सल्ला, उपचार व संदर्भ सेवा (Referrals) दिली जाईल:
• वैद्यकीय तपासणी: जनरल मेडिसिन, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, नेत्रतपासणी, दंतचिकित्सा, कान-नाक-घसा (ENT) आणि हृदयविकार तपासणी.
• चाचण्या: पूर्ण रक्त तपासणी (Full Blood Test) आणि लघवी तपासणीची सोय उपलब्ध असेल.
• औषध वाटप: गरजू सहभागींना आवश्यक औषधे विनामूल्य दिली जातील.
• रक्तदान: सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान करण्याची संधीही येथे उपलब्ध असेल.
सहभाग व नोंदणी (Registration)
• कोणासाठी: हे शिबिर प्रामुख्याने विद्यापीठातील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी असून, मर्यादित संख्येने नागरिकही यात सहभागी होऊ शकतात. ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर प्रवेश दिला जाईल.
• ऑनलाइन नोंदणी: सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी
https://forms.gle/X8eqJzuaKNzRMgk76 या गुगल फॉर्म लिंकवर आपली नोंदणी करावी.
महत्त्वाची सूचना – सर्व सहभागींनी सकाळी ९:३० वाजेपर्यंत आपले स्थान ग्रहण करावे, असे आवाहन संयोजक समितीमार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी डॉ. एम. व्ही. टाकळे (८४५९४८३४३३), डॉ. ए. आर. पाटील (९६३७५१६०८७) किंवा डॉ. एम. आर. वाईकर (९८६०८६१७५८) यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती डॉ.आर.जी. सोनकवडे यांनी दिली आहे.